वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:55 IST2025-06-06T06:54:51+5:302025-06-06T06:55:20+5:30

सध्या मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे.

Vashi-Mankhurd journey now convenient, inauguration of second lane of Vashi Creek Bridge | वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण

वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेला तीन मार्गिकांचा दुसरा पूल गुरुवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे वाशीकडून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद होईल. 
सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाला. त्यानंतर हा बहुप्रतीक्षित मार्ग प्रवासी सेवेत दाखल झाला.

सध्या मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा पूल १९९४ मध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र वाहतुकीचा ताण वाढल्याने  वाशी टोल नाका भागात मोठी वाहतूककोंडी होत होती. त्यावर उपाय म्हणून हा नवा पूल बांधण्यात आला आहे. 

पुणे आणि कोकणाकडे...

पुणे आणि नवी मुंबई भागातून मुंबईकडे येण्यासाठी वाशी खाडीपूल महत्त्वाचा आहे. त्यावरील वाहनभार वाढला आहे.  आता सुरू होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी वाढू शकते. त्यादृष्टीने गुरुवारी खुली झालेली मार्गिका उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • खर्च ७७५ कोटी रुपये
  • प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल
  • लांबी - १८३७ मीटर
  • मुंबईकडील पोहोचमार्ग - ३८० मी.
  • मुंबईकडील पुलाचे पिलर्स - २४
  • वापरलेले एकूण सेगमेंट - ४८८

Web Title: Vashi-Mankhurd journey now convenient, inauguration of second lane of Vashi Creek Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.