वर्तकनगर उड्डाणपूल मंजूर!

By Admin | Updated: July 7, 2014 00:53 IST2014-07-07T00:27:07+5:302014-07-07T00:53:46+5:30

मागील १० वर्षे सर्वाधिक वाहतूककोंडीने जर्जर झालेल्या वर्तकनगर झोनला आता खरोखरच अच्छे दिन बघायला मिळणार आहेत.

Varkarenagar flyover approved! | वर्तकनगर उड्डाणपूल मंजूर!

वर्तकनगर उड्डाणपूल मंजूर!

ठाणे : मागील १० वर्षे सर्वाधिक वाहतूककोंडीने जर्जर झालेल्या वर्तकनगर झोनला आता खरोखरच अच्छे दिन बघायला मिळणार आहेत. अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या कॅडबरी-शिवाईनगर उड्डाणपुलाला अखेर ठामपा आयुक्त असीम गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे.
कॅडबरी ते शिवाईनगर हा साधारण ३ किमीचा टप्पा असून त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. दोन्ही बाजूंनी फार कमी प्रमाणात लोक विस्थापित होतील, याची दक्षता घेतलेला ले-आऊटही तयार झाला असून १२० कोटी रुपयांचा खर्च असलेले टेंडरही लवकरच निघणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Varkarenagar flyover approved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.