पनवेलऐवजी वंदे भारत थेट कल्याणमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:11 IST2024-12-24T07:11:38+5:302024-12-24T07:11:54+5:30
ट्रेनला सुमारे दीड तासाचा लेटमार्क लागला. त्यानंतर पुढे ती नियोजित मार्गांवर चालविण्यात आली

पनवेलऐवजी वंदे भारत थेट कल्याणमध्ये
मुंबई : सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दिवा स्थानकातील पॉइंट फेल्युअरमुळे पनवेलऐवजी कल्याणमार्गे वळविण्यात आली. यामुळे या ट्रेनला सुमारे दीड तासाचा लेटमार्क लागला. त्यानंतर पुढे ती नियोजित मार्गांवर चालविण्यात आली, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
सीएसएमटी स्थानकातून वंदे भारत ट्रेन सुमारे साडेपाचच्या सुमारास मडगावकडे मार्गस्थ झाली होती. परंतु दिव्याजवळ सकाळी ६:१० ते ६:४५ या कालावधीत पॉइंट फेल्युअर म्हणजेच सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन यंत्रणेमध्ये बिघाड झाला. डाउन लोकल फास्ट मार्गावर हा बिघाड झाला असल्याने वंदे भारत सुमारे ४० मिनिटे तिथेच थांबवण्यात आली. मात्र, पुढील विलंब टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने ही गाडी कल्याणपर्यंत नेऊन परत मागे आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही गाडी पनवेलमार्गे मडगावला रवाना झाली.