Join us  

पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील कारवाई भोवली, 'त्या' अधिकाऱ्याचं निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 11:56 AM

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा परवाना रद्द करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

मुंबई - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा परवाना रद्द करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. परळीजवळील पांगरी येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात 8 डिसेंबर 2017 रोजी ऊसाच्या रसाच्या टाकीचा स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक कामगार जखमी झाले होते.

कारखान्यातील दुर्घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी कारखान्याची तपासणी केली होती. तपासणी दरम्यान कारखान्यात अनेक त्रूटी असल्याचं आढळून आल्याने कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. कारखान्याला परवाना देण्याचे काम एफडीएच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने आयुक्तांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचं कारण देत केरुरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कारवाई मागे घेऊन दुर्घटनेनंतर रद्द करण्यात आलेला कारखान्याचा परवाना पुन्हा बहाल करण्यात आला आहे. 

टॅग्स :पंकजा मुंडेसाखर कारखाने