पुरेशा लस साठ्याअभावी गुरूवारी मुंबईत लसीकरण बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 09:52 PM2021-06-02T21:52:49+5:302021-06-02T21:54:10+5:30

Coronavirus Vaccine : शासकीय आणि पालिका केंद्रांवर ३ जून रोजी लसीकरण राहणार बंद. शुक्रवारपासून मोहीम होणार पूर्ववत

Vaccination program closed in Mumbai on Thursday due to lack of adequate vaccine stocks coronavirus | पुरेशा लस साठ्याअभावी गुरूवारी मुंबईत लसीकरण बंद

पुरेशा लस साठ्याअभावी गुरूवारी मुंबईत लसीकरण बंद

Next
ठळक मुद्देशासकीय आणि पालिका केंद्रांवर ३ जून रोजी लसीकरण राहणार बंद. शुक्रवारपासून मोहीम होणार पूर्ववत

मुंबई - केंद्राकडून नवीन लसींचा साठा अद्याप उपलब्ध झालेला नाही. तर सध्या पालिकेकडे असलेला साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शासकीय आणि पालिका केंद्रावर गुरुवारी दि. ३ जून रोजी लसीकरण बंद राहणार आहे. नवीन साठा येण्याची शक्यता असल्याने शुक्रवारपासून लसीकरण मोहीम पूर्ववत होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. तर १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील निर्णायक टप्प्यात लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लसींचा साठा मर्यादित असल्याने वेळोवेळी लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे. आतापर्यंत ३३ लाख २४ हजार ४२८ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर सर्वाधिक १२ लाख २३ हजार ९७२ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.केंद्राकडून येणारा लसींचा साठा पुरेसा नसल्याने महापालिकेने जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार आठ पुरवठादारांनी पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सध्या लसींचा साठा उपलब्ध नसल्याने गुरुवारी लसीकरण मोहीम होणार नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vaccination program closed in Mumbai on Thursday due to lack of adequate vaccine stocks coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app