पुरेशा लस साठ्याअभावी गुरूवारी मुंबईत लसीकरण बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:54 IST2021-06-02T21:52:49+5:302021-06-02T21:54:10+5:30
Coronavirus Vaccine : शासकीय आणि पालिका केंद्रांवर ३ जून रोजी लसीकरण राहणार बंद. शुक्रवारपासून मोहीम होणार पूर्ववत

पुरेशा लस साठ्याअभावी गुरूवारी मुंबईत लसीकरण बंद
मुंबई - केंद्राकडून नवीन लसींचा साठा अद्याप उपलब्ध झालेला नाही. तर सध्या पालिकेकडे असलेला साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शासकीय आणि पालिका केंद्रावर गुरुवारी दि. ३ जून रोजी लसीकरण बंद राहणार आहे. नवीन साठा येण्याची शक्यता असल्याने शुक्रवारपासून लसीकरण मोहीम पूर्ववत होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. तर १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील निर्णायक टप्प्यात लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लसींचा साठा मर्यादित असल्याने वेळोवेळी लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे. आतापर्यंत ३३ लाख २४ हजार ४२८ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर सर्वाधिक १२ लाख २३ हजार ९७२ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
Dear Mumbaikars,
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 2, 2021
Please note that all BMC and Government vaccination centers will be closed tomorrow (June 3, 2021).
We apologize for the inconvenience.
Please watch this space for updates regarding vaccination centres and schedules #MyBMCvaccinationUpdate
केंद्राकडून येणारा लसींचा साठा पुरेसा नसल्याने महापालिकेने जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार आठ पुरवठादारांनी पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सध्या लसींचा साठा उपलब्ध नसल्याने गुरुवारी लसीकरण मोहीम होणार नाही.