चेंबूरमध्ये लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:51+5:302021-05-10T04:07:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चेंबूरमध्ये फ्रीवेखाली मीनाताई ठाकरे योगा कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या ...

Vaccination center started in Chembur | चेंबूरमध्ये लसीकरण केंद्र सुरू

चेंबूरमध्ये लसीकरण केंद्र सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूरमध्ये फ्रीवेखाली मीनाताई ठाकरे योगा कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नुकतेच या लसीकरण केंद्राचे उद्घाटन खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेविका अंजली नाईक म्हणाल्या की, पर्यटनमंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांतून नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांना लस मिळायला हवी. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक १४७ मध्ये फ्रीवेखाली मीनाताई ठाकरे योगा कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना येथे लस देण्यात येईल.

यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख व नगरसेवक सातमकर, स्थानिक नगरसेविका अंजली नाईक, अणुशक्तीनगर विधानसभा संघटक निमिष भोसले, उपविभागप्रमुख राजेंद्र पोळ, शाखाप्रमुख विजय नागावकर आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.

.....................................

Web Title: Vaccination center started in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.