Join us

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; धारावी, वांद्रे भागात उद्या पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 01:11 IST

धारावी येथे १५०० मि.मी. व्यासाची आणि १४५० मि.मी. व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनीच्या जलजोडणीचे काम येत्या शनिवारी हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई : जलजोडणीच्या कामानिमित्त धारावी आणि वांद्रे येथील काही परिसरांमध्ये या वीकेंडला पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे १८ आणि १९ जानेवारी रोजी या परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. यासाठी त्यांनी पाणी आदल्या दिवशी भरून ठेवावे व जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याने केले आहे.

धारावी येथे १५०० मि.मी. व्यासाची आणि १४५० मि.मी. व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनीच्या जलजोडणीचे काम येत्या शनिवारी हाती घेण्यात येणार आहे. हे काम २४ तास चालणार असल्याने या काळात जी/उत्तर आणि एच /पूर्व विभागांत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता जलजोडणीच्या कामाला सुरुवात करून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.या विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद१८ जानेवारी - जी /उत्तर विभाग - धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए.के.जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड व दिलीप कदम मार्ग.१९ जानेवारी - जी /उत्तर विभाग - धारावी सकाळचा पाणीपुरवठा - प्रेमनगर, नाईक नगर, ६० फीट रोड, जस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम.जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड.शनिवार, रविवार - एच /पूर्व विभाग - वांद्रे टर्मिनस परिसर

टॅग्स :पाणी