Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत कोरोना नियंत्रणात, आसपासच्या महापालिकेतही 'मुंबई मॉडेल' राबवा; हायकोर्टाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:49 IST

राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभावा आता हळूहळू ओसरत असताना मुंबई हायकोर्टानं महापालिकेच्या नियोजनाचं कौतुक केलं आहे.

राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभावा आता हळूहळू ओसरत असताना मुंबई हायकोर्टानं महापालिकेच्या नियोजनाचं कौतुक केलं आहे. याआधीच सुप्रीम कोर्टानंही मुंबई महापालिकेचं कौतुक केलं होतं. मुंबई लोकसंख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त असतानाही गेल्या आठवड्यापासून सातत्यानं कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टानं आता मुंबई मॉडेल आसपासच्या महापालिकेत राबवा, असे आदेश देण्यात आले आहेत. 

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं कोरोना व्यवस्थापनाबाबतीतील याचिकांवर एकत्रित सुनावणी देताना मुंबईतील कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात येत असल्याचा दाखला दिला. "राज्यात मुंबईतून सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत होते. पण महापालिकेच्या उत्तम नियोजनामुळे आता कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. याचं सुप्रीम कोर्टाकडूनही कौतुक झालं आहे. त्यामुळे मुंबई मॉडेल राज्यात इतर ठिकाणी आणि मुंबईजवळच्या महापालिकांमध्ये राबविण्यात यावं", असे आदेश खंडपीठानं दिले आहेत. मुंबईचं मॉडेल नजिकच्या नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथे नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे या महापालिकांनी मुंबई मॉडेलनुसार काम करायला हवं, असं कोर्टानं म्हटलं आहे.  

टॅग्स :मुंबई हायकोर्टमुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्या