Urmila Matondkars Instagram account hacked actor turned politician files fir | ऊर्मिला मातोंडकर यांचे ‘इन्स्टाग्राम’ हॅक; सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल

ऊर्मिला मातोंडकर यांचे ‘इन्स्टाग्राम’ हॅक; सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबई : अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. या प्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ‘माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. सुरुवातीला ते थेट मेसेज करताना काही स्टेप्स फॉलो करायला सांगतात, नंतर अकाउंट व्हेरिफाय करतात व मग ते हॅक होते. त्यामुळे सायबर क्राइमला सहजपणे घेऊ नये,’ असे ट्विट ऊर्मिला यांनी केले. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेताच त्यांच्याकडून या गुन्ह्यासंबंधी बरीच माहिती मिळाल्याचे सांगत, भविष्यात यावर काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Urmila Matondkars Instagram account hacked actor turned politician files fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.