Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत राबवली जाणार अर्बन फॉरेस्ट संकल्पना, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

By सीमा महांगडे | Updated: January 14, 2024 23:47 IST

Mumbai: मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे  प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषणाची पातळी ३०० वरून १०० पर्यंत खाली आली असून हे या अभियानाचे यश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. रविवारी पालिकेच्या दोन परिमंडळ मिळून तीन वॉर्डात डीप क्लिनिंग मोहिमेत मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

- सीमा महांगडे मुंबई - मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे  प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषणाची पातळी ३०० वरून १०० पर्यंत खाली आली असून हे या अभियानाचे यश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. रविवारी पालिकेच्या दोन परिमंडळ मिळून तीन वॉर्डात डीप क्लिनिंग मोहिमेत मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी स्वच्छता कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यापुढे या अभियानात सातत्य ठेवून मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविली जाणार असल्याचो माहिती ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

मुंबईत राबविण्यात येत असलेली स्वच्छता मोहीम व्यापक लोक चळवळ बनली आहे त्यामुळे या अभियानात सातत्य ठेवून प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘अर्बन फॉरेस्ट’ अधिकाधिक संख्येने तयार करण्याचे त्याचप्रमाणे, प्राणवायू अर्थात ऑक्सिजन मुबलक प्रमाणावर देणा-या बांबूची शक्य तितक्या ठिकाणी लागवड करण्याच्या सूचना ही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.  ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनारविवारच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आजी आजोबा पार्क मध्ये ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन अनेक योजना राबविल्या जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू करण्यात येत असून लवकरच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यामंत्र्यांनी यावेळी दिली. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था सुरू करावी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिकेला दिल्या आहेत. 

टॅग्स :एकनाथ शिंदे