जल्लोषासाठी अनधिकृत होर्डिंग्ज

By Admin | Updated: May 19, 2014 05:24 IST2014-05-19T05:24:18+5:302014-05-19T05:24:18+5:30

लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळाल्यामुळे शिवसेना व भाजपा पदाधिकार्‍यांनी शहरभर होर्डिंग्ज लावले आहेत.

Unofficial hoardings for the celebration | जल्लोषासाठी अनधिकृत होर्डिंग्ज

जल्लोषासाठी अनधिकृत होर्डिंग्ज

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळाल्यामुळे शिवसेना व भाजपा पदाधिकार्‍यांनी शहरभर होर्डिंग्ज लावले आहेत. राष्ट्रवादीनेही मतदारांचे आभार मानणारे होर्डिंग्ज लावले असून यापैकी कोणीच महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांनी विजय मिळविलाच शिवाय नवी मुंबईतूनही आघाडी मिळविली. यामुळे शिवसेना, भाजपा व नमो ब्रिगेडमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी शुक्रवारीच शहरात होर्डिंग्ज लावले आहेत. अनेकांनी आज होर्डिंग्ज लावले आहेत. प्रत्येक चौक व महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग्ज दिसत आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसला बालेकिल्ल्यातही धक्का बसला आहे. परंतु यानंतरही पक्षाने मतदारांचे आभार मानणारे होर्डिंग्ज शहरात लावले आहेत. शहरातील बहुतांश होर्डिंग्जला महापालिकेची परवानगी घेण्यातच आलेली नाही. पालिकेची परवानगी घेतलेला स्टिकर होर्डिंग्जवर चिटकविण्यात आलेला नाही. विनापरवाना जाहिरातबाजीमुळे महापालिकेचे नुकसान झाले असून शहराचा चेहराही विद्रूप होवू लागला आहे. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु नवी मुंबईत या आदेशाचे पालन होत नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची होर्डिंगबाजी सुरू झाली असून आता तरी महानगरपालिका प्रशासन हे होर्डिंग्ज हटविणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Unofficial hoardings for the celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.