मुंबईमुंबईतील दादर परिसरात एक अजब प्रकार समोर आला आहे. एक अनोळखी तरुण एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या मारत आहे. संबंधित तरुण अर्धनग्न अवस्थेत असून मनोरुग्ण असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचले असून या तरुणाचा पाठलाग करताना त्यांचीही दमछाक होत आहे.
दादरच्या टीटी परिसरात रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या चार मजली इमारतींवर एक तरुण अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याची माहिती एका स्थानिकाने पोलिसांना फोन करुन दिली. संबंधित तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. पण हा तरुण इमारतीच्या तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरुन बाजूच्या इमारतींवर उड्या मारत फिरत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं आहे. सध्या या तरुणाची समजून घालण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. पण तरुण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं दिसत आहे.
LIVE: मुंबईत दादर परिसरात अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलीस करताहेत पाठलाग
Web Summary : A semi-nude youth was seen jumping between buildings near Dadar station. Police and firefighters are on the scene, attempting to apprehend the individual, suspected to have mental health issues. The youth is unresponsive to their appeals, making the situation challenging.
Web Summary : दादर स्टेशन के पास एक अर्धनग्न युवक को इमारतों के बीच कूदते हुए देखा गया। पुलिस और दमकलकर्मी मौके पर हैं और व्यक्ति को पकड़ने की कोशिश कर रहे हैं, जिसके मानसिक स्वास्थ्य समस्याओं से पीड़ित होने का संदेह है। युवक उनकी अपीलों का जवाब नहीं दे रहा है, जिससे स्थिति चुनौतीपूर्ण हो गई है।