विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा आता २३ डिसेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 06:50 IST2018-11-07T06:50:08+5:302018-11-07T06:50:24+5:30
मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमच आॅनलाइन घेण्यात येणारी पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) रविवार २३ डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती.

विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा आता २३ डिसेंबरला
मुंबई - मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमच आॅनलाइन घेण्यात येणारी पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) रविवार २३ डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. मात्र, या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली आहे.
पीएच.डी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) आता १५ डिसेंबर २०१८ पासून आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल. या आॅनलाइन प्रवेश परीक्षेचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवेश शुल्क भरण्याची सुविधादेखील आॅनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१६च्या नवीन निर्देशानुसार विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी व एमफीलच्या प्रवेशाच्या संदर्भात कुलगुरूंचे निर्देश प्रसिद्ध केले होते. या आधारावर २०१८ ची पीएच.डी व एमफील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या पेट परीक्षेचे अर्ज फक्त आॅनलाइन असतील. विद्यार्थ्यांना त्याची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही, परंतु सदर अर्जाची प्रिंटआउट पुढील संदर्भासाठी काढून ठेवण्यात यावी, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. या पेट परीक्षेचे अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.