मुंबई : मुंबई विद्यापीठानेमहाविद्यालय विकास समिती (सीडीसी) स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ८० कॉलेजांवर कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा पवित्रा घेतला आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांनी विकास समिती स्थापणे बंधनकारक असते.
... तर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नकाही समिती स्थापन न करणाऱ्या महाविद्यालयांत पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थाना प्रवेश देण्यात येऊ नयेत, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तसेच समिती स्थापन न करणाऱ्या सर्व महाविद्यालयांना एकाच वेळी नोटीस देण्याचे निर्देशही दिले आहेत. महाविद्यालय संलग्नता विभागाला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वारंवार सांगूनही दुर्लक्षदरवर्षी प्रवेश प्रक्रियेवेळी सीडीसी स्थापन करण्याची अट कॉलेजांना घातली जाते. त्यानंतरही अनेक कॉलेजांनी ही समिती स्थापन केली नव्हती. समिती स्थापन करण्यासाठी कॉलेजांना वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यानंतरही काही बदल न झाल्याने अखेर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.