विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचाच निर्णय 

By सीमा महांगडे | Published: October 4, 2022 06:48 PM2022-10-04T18:48:08+5:302022-10-04T18:48:31+5:30

युवासेनेने विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत गुरूवारी विद्यापीठाच्या कलिना परिसरातील परीक्षा भवनमध्ये परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला.

University postpones winter session exams; The decision of the university administration itself after the demand of the student union | विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचाच निर्णय 

विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचाच निर्णय 

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा येत्या १० ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार होत्या, मात्र त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.  

माटुंगामधील डी. जी. रुपारेल महाविद्यालय, परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालय, विक्रोळीतील विकास महाविद्यालय, वांद्रे येथील रिझवी महाविद्यालय, नॅशनल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवले होते. मात्र विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडून ती फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली.

युवासेनेने विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत गुरूवारी विद्यापीठाच्या कलिना परिसरातील परीक्षा भवनमध्ये परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला. तसेच पाचव्या सत्राची परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या  विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सत्र ५ बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

एकूण ४५० हुन अधिक परीक्षा-

मुंबई विद्यापीठ २०२२ च्या हिवाळी सत्रामध्ये  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व  आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे. 

२०२२ च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. - डॉ. प्रसाद कारंडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ

Web Title: University postpones winter session exams; The decision of the university administration itself after the demand of the student union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.