मुंबई विद्यापीठ देणार पालकत्वाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:51 AM2018-12-14T00:51:07+5:302018-12-14T00:51:17+5:30

पालक-बालक नाते हे मानवाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील आधारभूत नाते असते, पण पालकत्वाचे प्रशिक्षण आपल्याकडे अभावानेच दिले जाते.

The University of Mumbai will learn the principles of parenting | मुंबई विद्यापीठ देणार पालकत्वाचे धडे

मुंबई विद्यापीठ देणार पालकत्वाचे धडे

Next

मुंबई : पालक-बालक नाते हे मानवाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील आधारभूत नाते असते, पण पालकत्वाचे प्रशिक्षण आपल्याकडे अभावानेच दिले जाते.

विविध वयोगटांतील पाल्यांशी कसे वागावे याबद्दलचे बरेचसे ठोकताळे हे चुका-शिका पद्धती किंवा आपले लहानपणीचे अनुभव यांवर आधारित असतात आणि या नात्यासंदर्भात काही गंभीर समस्या निर्माण झाल्यास त्यांची हाताळणी करण्यास ते अपुरे ठरतात. हे नाते सुंदरपणे उमलावे यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा समावेश असणाऱ्या प्रगतीशील पालकत्व या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे १६ डिसेंबर रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याचे आयोजन आरोग्य भवन, विद्यानगरी कॅम्पस येथे करण्यात आले असल्याची माहिती विभागाच्या संचालिका डॉ. मिनल कातरणीकर यांनी सांगितले.

यासोबतच १५ डिसेंबर २०१८ ला सागरी वैद्यक : वर्तमान व भविष्य या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत फिरोजशाह मेहता भवन, विद्यानगरी कॅम्पस येथे करण्यात आले आहे. समुद्र म्हटला की फक्त मासेमारी, पर्यटन व तत्संबंधी गोष्टीच आपल्याकडे प्रचलित आहेत. भारताला एवढा मोठा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभूनही समुद्राच्या औषधी गुणधर्माकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही.

Web Title: The University of Mumbai will learn the principles of parenting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.