Join us

परीक्षेला पोहचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मुंबई विद्यापीठ परत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 20:20 IST

आज झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच अंधेरीतील रेल्वेचा पूल कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला पोहचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मुंबई विद्यापीठ परत घेणार आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच लावण्यात येईल.

मुंबई - आज झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच अंधेरीतील रेल्वेचा पूल कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला पोहचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मुंबई विद्यापीठ परत घेणार आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच लावण्यात येईल.

 आज दिनांक ३ जुलै २०१८ रोजी सकाळच्या सत्रात २ व दुपारच्या सत्रात ४ अशा ६ परीक्षा आणि एमएस्सी व एमसीए या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा होत्या. सकाळच्या सत्रात  एमए सत्र-३  दोन  परीक्षा केंद्र व व एलएलबी सत्र -१ ची रिपिटर विद्यार्थ्यांची परीक्षा ४८ केंद्रावर होती. तर दुपारच्या सत्रात  एमए सत्र- ३ एका परीक्षा केंद्रावर, एमए व एमएस्सी - रिसर्च सत्र -३  हि परीक्षा दहा केंद्रावर आणि एलएलबी सत्र -५ हि रिपिटर विद्यार्थ्यांची परीक्षा ६ जिल्ह्यातील ४८ केंद्रावर होती.

आज काही अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक  परीक्षा  होत्या. यामध्ये  एमएस्सी  सत्र-२      ( बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी व फिजिक्स), एमएस्सी सत्र-४ बायोअनॅलिटीकल सायन्स,बॉटनी,ऑरग्यानिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, एनव्हायरमेंटल सायन्स, आय.टी, लाईफ सायन्स,  न्युट्रासिटीकल्स, स्टॅटिस्टिक्स, झूलॉजी, ओशोनोग्राफी, झूलॉजी (अनिमल फिजॉलॉजी ) या अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा त्या त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रावर होत्या.तसेच एमसीए सत्र - ६ अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा एमसीएच्या महाविद्यालयात आज होत्या.  साधारणतः किती विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले, याचा आढावा विद्यापीठ घेत आहे. आज जे विद्यार्थी परीक्षेस पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहो याची दक्षता विद्यापीठ घेत आहे, अशी माहिती स्था. उपकुलसचिव (जनसंपर्क)  विनोद  माळाळे यांनी दिली. 

 

टॅग्स :मुंबई विद्यापीठपरीक्षाअंधेरी पूल दुर्घटना