मुंबई महापौरपदासाठी चुरस, अस्वस्थता आणि मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 01:55 AM2019-11-15T01:55:00+5:302019-11-15T01:55:57+5:30

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी जुळवाजुळव सुरु आहे.

Uncomfortable, uncomfortable and frugal for the mayor of Mumbai | मुंबई महापौरपदासाठी चुरस, अस्वस्थता आणि मोर्चेबांधणी

मुंबई महापौरपदासाठी चुरस, अस्वस्थता आणि मोर्चेबांधणी

Next

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी जुळवाजुळव सुरु आहे. तेथील राजकीय समीकरण बिघडल्यास त्याचा परिणाम महापौर निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत संख्याबळ अधिक असूनही शिवसेनेच्या शिलेदारांची धाकधूक वाढली आहे. हे प्रतिष्ठेचे पद मिळवण्यासाठी एकीकडे इच्छुक ज्येष्ठ नगरसेवकांची मोचेर्बांधणी सुरु असताना काँग्रेसच्या भूमिकेकडे शिवसेना नेते डोळे लावून आहेत.
गेली २१ वर्षे शिवसेना-भाजप महापालिकेत सत्तेवर असल्याने महापौरपदाची निवडणूक एक औपचारिकता म्हणून पार पडत असे. या काळात शिवसेनेने मात्र भाजपला कायम महापौर पदापासून दूर ठेवले. त्यामुळे महापौरपदाचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून भाजपने २०१७ मध्ये स्वबळावर निवडणूक लढविली. परंतु, शेवटच्या क्षणी राज्यातील
सत्तेसाठी भाजपला महापौरपदावर पाणी सोडावे लागले होते. मात्र यावेळेस युती संपल्यातच जमा असल्याने महापालिकेत दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचे मनसुबे आखले आहेत.
यासाठी काँग्रेसला हाताशी धरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापौरपदासाठी भाजप स्वत: उमेदवार देण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी भाजप काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता आहे.
मात्र या दोन्ही शक्यता राज्यातील काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी अर्ज भरण्याची तारीख चार दिवसांवर आली तरी अद्याप शिवसेनेत अस्वस्थता आहे. हे पद खुल्या प्रवगार्साठी आरक्षित असून २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
अनुभवी, आक्रमक नेतृत्व हवे....
भाजप विरोधी पक्षात बसल्यास त्यांच्याकडून शिवसेनेची पुढील अडीच वर्षे कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान थोपविण्यासाठी शिवसेनेला सध्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मात्र शिवसेनेत काही मोजकेच आक्रमक, अनुभवी नगरसेवक शिल्लक आहेत. अनुभवी नगरसेवकालाच महापौरपदाची संधी मिळावी, असे ज्येष्ठ नगरसेवकांचे मत आहे.
यांची नावे चर्चेत..
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विजयात योगदान असलेले आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, कायम डावलले गेल्यानंतरही पक्षनिष्ठ असलेले मंगेश सातमकर आणि महापौरपदाच्या आक्रमक कारकीदीर्साठी ओळखल्या जाणा-या विशाखा राऊत यांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत.
>स्पर्धेत जाधव यांचे नाव पुढे...
महापौर पदाच्या स्पर्धेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मजीर्तील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव सर्वात पुढे असल्याचे समजते. जाधव यांच्या पत्नी व माजी नगरसेविका यामिनी जाधव भायखळा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मुस्लिम बहुल मतदार संघातून यापुर्वी कधीच शिवसेनेचा आमदार निवडून आला नव्हता. पहिल्यादांच ही जागा शिवसेनेने मिळवली आहे. त्यामुळे महापौरपदावर जाधव यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
>पालिकेतील
पक्षीय बलाबल
शिवसेना : ९४
भाजप : ८२
काँग्रेस : २९, राष्ट्रवादी : ८
समाजवादी पक्ष : ६
एमआयएम : २, मनसे : १
>वर्ष... महापौर (शिवसेना)
महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. २१ वर्षे भाजपबरोबर युती असल्याने शिवसेनेचा महापौर निवडून येत आहे.
२००७-२००९ - डॉ. शुभा राऊळ (हुक्का पार्लर बंदी, प्लास्टिक बंदी, गणेशमूर्तींच्या उंचीवर मयार्दा आणण्याची मागणी यामुळे कारकीर्द गाजली.)
२००९-२०१२ - श्रद्धा जाधव
२०१२-२०१४ - सुनिल प्रभू (उत्तम वक्ता व सभागृहावर चांगली पकड, विरोधी पक्षातही लोकप्रिय ठरले होते )
२०१४-२०१७ - स्नेहल आंबेकर (रस्ते घोटाळ्याची तक्रार, मनसेने वायरल केलेले टक्केवारीचे वादग्रस्त संभाषण यामुळे वादात)
२०१७-२०१९ - विश्वनाथ महाडेश्वर (यांच्या कार्यकाळात अनेक वाद निर्माण झाले. त्यापैकी सांताक्रूझ येथे महिलेचा हात पिरगळल्याचा आरोप फार काळ चर्चेत राहिला)

Web Title: Uncomfortable, uncomfortable and frugal for the mayor of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.