Join us  

नितीश ठाकूरला अटक होते पण विजय मल्ल्याच्यावेळी कायदा ‘हात चोळत’ बसतो - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 7:25 AM

‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूर प्रकरणात सरकारने घेतलेले श्रम विजय मल्ल्या प्रकरणात का घेतले नाहीत? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यातील ‘काँगेस-राष्ट्रवादी’ आरोपींची ‘दिवाळी-होळी’ तुरुंगातच जाईल अशा वल्गना पोकळ ठरल्या आहेत. गुजरात निवडणुकीत काही हजार कोटी रुपये विजयप्राप्तीसाठी उधळले गेले ते काय ‘देवपूजा’ करून मिळवले? असा सवाल विचारला आहे. 

मुंबई - ‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूर प्रकरणात सरकारने घेतलेले श्रम विजय मल्ल्या प्रकरणात का घेतले नाहीत? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. ऐकावे ते नवलच अशा अनेक नवलाईच्या गोष्टी आपल्या देशात घडत असतात. कायद्याचे हात लांब असतात ते हे असे. फक्त ते १००-२०० कोटींचा गफला करणाऱ्यांपर्यंत सहज पोहोचतात व दहा-वीस हजार कोटींत स्वदेशी बँकांना बुडवून पसार झालेल्या मल्ल्यापर्यंत पोहोचत नाहीत. कायद्याचे हेच हात अशा वेळी ‘हात चोळत’ बसतात असे लेखात म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यातील ‘काँगेस-राष्ट्रवादी’ आरोपींची ‘दिवाळी-होळी’ तुरुंगातच जाईल अशा वल्गना पोकळ ठरल्या आहेत. आता हेच सिंचनवाले राज्यकर्त्यांचे खासम खास बनले आहेत. भुजबळ आत सडत आहेत, पण तशीच प्रकरणे घडविणारे अनेक जण बाहेर बागडत आहेत. गुजरात निवडणुकीत काही हजार कोटी रुपये विजयप्राप्तीसाठी उधळले गेले ते काय ‘देवपूजा’ करून मिळवले? असा सवाल विचारला आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात - ‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूर प्रकरणात सरकारने घेतलेले श्रम विजय मल्ल्या प्रकरणात का घेतले नाहीत? विजय मल्ल्याच्या बाबतीतही ‘रेड कॉर्नर’ नोटिसा वारंवार बजावण्यात आल्या. वॉरंट निघाले, पण हे ‘महात्मा’ मल्ल्या त्यांचे ऐषारामी जीवन लंडन येथे सुखाने जगत आहेत. ठाकूर हा छोटा मासा होता. तो सहज हाती लागला. मल्ल्या मोठा मासा आहे. तो हाती लागता लागत नाही. कायद्याचे हात लांब आहेत, पण आरोपी किती ‘उंचा’ आहे हे पाहूनच ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात काय?

- ऐकावे ते नवलच अशा अनेक नवलाईच्या गोष्टी आपल्या देशात घडत असतात. ‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूरला संयुक्त अरब अमिरातीतून अटक करण्यात आली आहे. ठाकूर हा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपी आहे. म्हाडाच्या पदावर असताना त्याने कोट्यवधी रुपयांची माया जमवली व त्याची संपत्ती २०० कोटींहून जास्त असल्याचे सांगितले जाते. सरकारातील अनेक ‘मलईदार’ पोस्टींग त्यास सहज मिळत गेल्या व मलई वाटून खाण्यावर त्याचा भर होता, पण शेवटी त्यास मलईचे अजीर्ण झाले. अटक झाली, महाशय जामिनावर सुटले व नेपाळमार्गे आखाती राष्ट्रात पळून गेले. त्याच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी झाली व हिंदुस्थान सरकारच्या अथक परिश्रमाने तो पकडला गेला. या अथक परिश्रमाबद्दल हिंदुस्थान सरकारचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. परकीय भूमीवर लपून बसलेल्या एका भ्रष्ट अधिकाऱ्यास अखेर ‘बेड्या’ ठोकल्या. कायद्याचे हात लांब असतात ते हे असे. फक्त ते १००-२०० कोटींचा गफला करणाऱ्यांपर्यंत सहज पोहोचतात व दहा-वीस हजार कोटींत स्वदेशी बँकांना बुडवून पसार झालेल्या मल्ल्यापर्यंत पोहोचत नाहीत. कायद्याचे हेच हात अशा वेळी ‘हात चोळत’ बसतात. बेनामी संपत्ती व चारा घोटाळाप्रकरणी लालू यादव तुरुंगात आहेत, पण आजही असे अनेक ‘लालू’ सरकारी कृपेने मुक्त जीवन जगत आहेत. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यातील ‘काँगेस-राष्ट्रवादी’ आरोपींची ‘दिवाळी-होळी’ तुरुंगातच जाईल अशा वल्गना पोकळ ठरल्या आहेत. आता हेच सिंचनवाले राज्यकर्त्यांचे खासम खास बनले आहेत. भुजबळ आत सडत आहेत, पण तशीच प्रकरणे घडविणारे अनेक जण बाहेर बागडत आहेत. गुजरात निवडणुकीत काही हजार कोटी रुपये विजयप्राप्तीसाठी उधळले गेले ते काय ‘देवपूजा’ करून मिळवले? ‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूर प्रकरणात सरकारने घेतलेले श्रम विजय मल्ल्या प्रकरणात का घेतले नाहीत? विजय मल्ल्याच्या बाबतीतही ‘रेड कॉर्नर’ नोटिसा वारंवार बजावण्यात आल्या. वॉरंट निघाले, पण हे ‘महात्मा’ मल्ल्या त्यांचे ऐषारामी जीवन लंडन येथे सुखाने जगत आहेत. ठाकूर हा छोटा मासा होता. तो सहज हाती लागला. मल्ल्या मोठा मासा आहे. तो हाती लागता लागत नाही. कायद्याचे हात लांब आहेत, पण आरोपी किती ‘उंचा’ आहे हे पाहूनच ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात काय?

टॅग्स :उद्धव ठाकरेविजय मल्ल्या