Join us  

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:48 PM

या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? असा सवाल हायकोर्टाने करत तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.हायकोर्टाच्या दोन वेगवेगळ्या खंडपीठांनी ही याचिका सुनावणीसाठी घेण्यास नकार दिला.लग्नानंतर घटस्फोट होणं हे नवीन आहे का असा टोला देखील हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना लगावला.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरोधी महाराष्ट्र विकास आघाडीने बाजी मारल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात आज दाखल करण्यात आली. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? असा सवाल हायकोर्टाने करत तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. लग्नानंतर घटस्फोट होणं हे नवीन आहे का असा टोला देखील हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना लगावला.

गुरुवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला स्थगिती मिळावी यासाठी काही वकिलांनी एकत्र येऊन मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेत मतदानापूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र युती म्हणून निवडणुकीला उभे राहिले असल्याने त्यांचेच सरकार स्थापन करायला हवे होते. मात्र. हायकोर्टाच्या दोन वेगवेगळ्या खंडपीठांनी ही याचिका सुनावणीसाठी घेण्यास नकार दिला.

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबईउद्धव ठाकरेमुख्यमंत्रीवकिल