Join us  

'सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच उद्धव ठाकरे अयोध्येला जातील'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:00 PM

'श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील'

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. तसेच, श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, प्रभू श्रीरामाची कृपेने महाविकास आघाडीचे सरकार जोरात कामास लागले आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, "सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच!प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील."

दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपाला आव्हान दिले होते. नंतर भाजपा आणि शिवसेनेची दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती बदलली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्ता चालवताना शिवसेनेने अनेक मुद्दे बाजुला ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे  पुन्हा अयोध्येला जाणार नाहीत, असे बोलले जात होते. मात्र, मात्र संजय राऊत यांनी ट्विट करून आज हे स्पष्ट केले की उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला भेट देणार आहेत. 

(नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 26 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी)

(ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले सहा मोठे निर्णय, आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड)

(पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा)

('ही नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ', भाजपाची राज्य सरकारवर टीका)

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतशिवसेना