मुंबई : उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानी लोकसभानिहाय मतदारसंघाचा २६ डिसेंबरपासून आढावा घेणार आहेत.
महापालिका जिंकण्यासाठी उद्धवसेनेने तयारी सुरू केली आहे. पक्ष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालावर २६ ते २९ डिसेंबर असे चार दिवस उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. २६ डिसेंबरला (बोरिवली, दहीसर, मागाठाणे, दिंडोशी, चारकोप, कांदिवली, मालाड), २७ डिसेंबरला (अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना), २८ डिसेंबर (मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द-शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा) आणि २९ डिसेंबरला (धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुबादेवी, कुलाबा) अशा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.