Join us  

शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावास ब्रेक, वेळ देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 12:20 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार भेटीसाठी नकार दिल्यांनी ही बैठक लांबवणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबई - शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावाला तूर्तास ब्रेक लागला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये आज होणारी बैठक लांबणीवर गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी नकार दिल्यांनी ही बैठक लांबवणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. 

अहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण आणि रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला होणा-या विरोधामुळे ही भेट नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ देण्यास तूर्तास नकार दिला आहे. 

''मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही''

अहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण आणि रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला होणा-या विरोधामुळे ही भेट नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ देण्यास तूर्तास नकार दिला आहे. 

अहमदनगरमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची दहा दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आज त्यांचा दशक्रिया विधी पार पडला यावेळी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक आमदार, शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.  शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते गेले याची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शासन झालेच पाहिजे. अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. जोपर्यंत त्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेसुधीर मुनगंटीवारशिवसेनाभाजपा