Join us  

"उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 11:18 AM

कंबोज यांच्या ट्विटला सुषमा अंधारे त्यांच्या शैलीत काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे. 

मुंबई - राज्याच्या राजकारणात शिवसेनाविरुद्ध भाजपा असा सामना कायम पाहायला मिळत आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गट कमकुवत झाल्याचं बोललं जात होते. परंतु ठाकरे गटात नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांनी आक्रमकपणे भाजपा, शिंदे गट आणि मनसे नेत्यांवर हल्ला सुरूच ठेवला आहे. महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे राज्यात ठिकठिकाणी जात सत्ताधारी पक्षांवर तोंडसुख घेत आहेत. त्यावरून आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी अंधारे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

मोहित कंबोज यांनी ट्विट करून म्हटलंय की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांचे Female Version लॉन्च केले आहे. सलीम जावेद आणि आता....? असं म्हणतं कंबोज यांनी अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधलाय. कंबोज यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्येही सुषमा अंधारेंचा उल्लेख युजर्सने केला आहे. त्यामुळे कंबोज यांच्या ट्विटला सुषमा अंधारे त्यांच्या शैलीत काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे. 

कोण आहे मोहित कंबोज?मोहित कंबोज हे भाजपाचे समर्थक असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. राज्यातील शिंदे यांच्या बंडाच्या भूमिकेतही कंबोज यांनी मोठी भूमिका बजावल्याचं दिसून आले. सूरतमार्गे गुवाहाटी असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि ४० शिवसेना आमदारांसोबत मोहित कंबोज सातत्याने दिसून आले. इतकेच नाही तर अलीकडेच मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले असता तेव्हाही मोहित कंबोज सोबत होते. यावेळी मोहित कंबोज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. संजय राऊत आणि नवाब मलिकांविरोधात कंबोज सातत्याने टीका करायचे. राऊत जेलमध्ये जाणार हे भाष्य कंबोज यांनी आधी केले होते. 

सुषमा अंधारेंचा भाजपा-शिंदे गटावर हल्लामहाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि महाराष्ट्र चाले अशी परिस्थिती आहे. तुम्ही काही बोलला तर आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो असं होत आहे. महाप्रबोधन यात्रा सूनियोजित पक्षाचा कार्यक्रम आहे. मात्र शिंदे गटाने पैसा प्रचंड पेरला. प्रचंड माणसं तोडली मात्र एवढी सगळी माणसं तोडून सुद्धा अजेंड्यावर काम करायला एकही माणूस नाही. म्हणजे सगळं गाव मामाचा एक नाही कामाचा अशी त्यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करण्यास एकही माणूस नसेल तर त्यांचा दोष काय पैशांवर माणसं विकत घेता येऊ शकतात. पैशावर बुद्धी आणि निष्ठा विकत घेता येऊ शकत नाही असा हल्लाबोल सुषमा अंधारेंनी भाजपा-शिंदे गटावर केला.  

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतमोहित कंबोज भारतीयसुषमा अंधारे