Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 11:15 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सामनाच्या संपादक पदावरुन उद्धव ठाकरेंना बाजुला व्हावे लागले. त्यामुळे, कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांच्याकडेच 'सामना' या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्राची जबाबदारी होती. तर, कार्यकारी संपादकपदही त्यांच्याकडेच होते. आता, सामनाच्या संपादकपदी श्रीमती रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे हे 'सामना'चे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते. आपल्या सामना या वर्तमानपत्रातून शिवसेना आपली भूमिका मांडत असते. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारवर ठाकरे शैलीत टीकाही करण्यात येते. आता, या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरेंकडे आली आहे. 

संपादक हे पद लाभाचं पद असल्यामुळं ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी होत्या. सामना वर्तमानपत्राच्या क्रेडिट लाइनमध्ये आता रश्मी ठाकरे यांचं नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे. गेले काही महिने हे पद रिक्त होते. सध्या संपूर्ण जबाबदारी ही संजय राऊत यांच्याकडे होती. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते. देशाच्या राजकारणात सामना वर्तमानपत्रातील अग्रलेखावरुनच शिवसेनेची भूमिका समजून घेतली जाते. त्यावरुनच, चर्चा घडल्या जातात. आता, याच देशपातळीवर चर्चिले जाणाऱ्या सामनाच्या 'संपादक'पदाची जबाबदार रश्मी ठाकरेंकडे देण्यात आली आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबई