Join us

उद्धव ठाकरे यांचे अयोध्येवरून मुंबईत आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 19:14 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी 4 वाजता अयोध्येवरून मुंबईत आगमन झाले.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी 4 वाजता अयोध्येवरून मुंबईत आगमन झाले. सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळावर फैजाबाद विमानतळावरून एका खाजगी विमानाने आगमन झाले.यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत विमानतळावर एकच गर्दी करून त्यांचे जोरदार स्वागत केले.यावेळी विमानतळावर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत,शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी ठाकरे कुटुंबियांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत आगमन झाल्यावर त्यांनी अयोध्या दौरा यशस्वी झाल्याबद्दल मातोश्री येथील शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेसमोर वंदन करुन आशीर्वाद घेतले.याप्रसंगी शिवसेना नेते दिवाकर रावते , शिवसेना सचिव विनायक राऊत , सचिव आदेश बांदेकर , सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना