Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेविरोधात स्वाभिमानचा ‘यू-टर्न’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 00:30 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात प्रहार करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ‘यू-टर्न’ या दिनदर्शिकेचे अनावरणशुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात केले.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात प्रहार करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ‘यू-टर्न’ या दिनदर्शिकेचे अनावरणशुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात केले. या वेळी पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार टीका केली. तसेच कोकणच्या विकासासाठी स्वाभिमानशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोकणात केलेल्या कामांचा पाढा वाचताना राणे यांनी गेल्या ५ वर्षांमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनी कोकणला पुन्हा मागे नेऊन ठेवल्याचा आरोप केला. कोकणचा विकास करायचा असेल आणि कोकणी माणसाला कोकणात स्वाभिमानाने जगायचे असेल, तर स्वाभिमान पक्षाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. या वेळी त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार श्याम सावंत, पक्षाचे मुंबई अध्यक्ष राजेश हटले, प्रवक्ते संदीप कुरतडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :नीतेश राणे