इमारत तयार होऊन दोन वर्षे झाली तरी ताबा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:46 AM2019-09-16T00:46:43+5:302019-09-16T00:46:53+5:30

मालाड पश्चिम येथील राठोडी स्थित तक्षशिला सहकारी गृहनिर्माण संस्थेची २२ मजली (एसआरए प्रकल्प) इमारत गेल्या दोन वर्षांपासून पूर्णावस्थेत होती.

Two years after the building was ready, no occupation | इमारत तयार होऊन दोन वर्षे झाली तरी ताबा नाही

इमारत तयार होऊन दोन वर्षे झाली तरी ताबा नाही

Next

- मनोहर कुंभेजकर 
मुंबई : मालाड पश्चिम येथील राठोडी स्थित तक्षशिला सहकारी गृहनिर्माण संस्थेची २२ मजली (एसआरए प्रकल्प) इमारत गेल्या दोन वर्षांपासून पूर्णावस्थेत होती. मात्र असे असतानाही एसआरएच्या चालढकल करण्याच्या प्रवृत्तीमुळे या संस्थेतील सदस्यांना घरे हस्तांतरीत करण्यात आली नव्हती. याचा निषेध करण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नुकतेच अनोखे आंदोलन केले.
गोपाळ शेट्टी यांनी यावेळी ९८ पात्र, २३ अपात्र आणि पोटमाळ्यावर राहणाऱ्या ३५ अशा एकूण १५६ झोपडीधारकांना लॉटरी काढून चक्क घराचा ताबाच दिला. सदर २२ मजली इमारत दोन वर्षापासून कोळी भूमी पुत्रांनी विकासक म्हणून पूर्ण केली आहे, अशी माहिती वास्तुविशारद भूषण वाडे व सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली. खासदारांनीच एसआरए प्रशासनाविरोधात आंदोलन केल्याने यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या सुधारित झोपडपट्टी कायदा २०१७ आणि अधिकृत गॅझेट २०१८ यांमध्ये यासंबंधीच्या नियमाचा स्पष्ट उल्लेख आहे. या निर्णयाला महाराष्ट्र शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाने ६ सप्टेंबर २०१९ रोजी लिखित रुपात मान्यता दिलेली आहे. तरिही कायद्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कष्टकरी कुटुंबांना स्वत:च्या हक्काच्या घरात जाता येत नाही. याचा निषेध करण्यासाठी आपण हे आंदोलन केले, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.

Web Title: Two years after the building was ready, no occupation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.