सलमानच्या खटल्यात दोघा साक्षीदारांचे जबाब शिल्लक

By Admin | Updated: February 19, 2015 02:46 IST2015-02-19T02:46:53+5:302015-02-19T02:46:53+5:30

अनेक वर्षे प्रलंबित असलेला अभिनेता सलमान खानचा ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा खटला आता अंतिम टप्प्यात आला असून, यातील शेवटच्या दोन साक्षीदारांची साक्ष शिल्लक आहे़

Two witnesses in the case of Salman Khan's account balance | सलमानच्या खटल्यात दोघा साक्षीदारांचे जबाब शिल्लक

सलमानच्या खटल्यात दोघा साक्षीदारांचे जबाब शिल्लक

मुंबई : अनेक वर्षे प्रलंबित असलेला अभिनेता सलमान खानचा ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा खटला आता अंतिम टप्प्यात आला असून, यातील शेवटच्या दोन साक्षीदारांची साक्ष शिल्लक आहे़
या खटल्यात सोमवारी एका आरटीओ अधिकाऱ्याची साक्ष नोंदवण्यात आली़ सलमानच्या गाडीला ७८६ नंबर कसा देण्यात आला, हे न्यायालयाला सांगितले़ विशेष नंबर देण्याचे अधिकार आरटीओ अधिकाऱ्याला आहेत़ सलमाननेही या नंबरसाठी रीतसर अर्ज केला होता व त्यानुसार त्याला तो नंबर मिळाला, असे या अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले़
त्यानंतर केमिकल अ‍ॅनलायझरची साक्ष नोंदवण्यात आली़ या साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर यातील दोन तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात येईल़ हे शेवटचे दोन साक्षीदार आहेत, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले़ या खटल्यात आतापर्यंत २० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे़ वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले़ (प्रतिनिधी)

Web Title: Two witnesses in the case of Salman Khan's account balance