बोरिवलीत रेल्वेच्या डंपिंग यार्डमधून साकारले टू व्हिलर वाहनतळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 08:38 PM2018-08-01T20:38:16+5:302018-08-01T20:38:34+5:30

सध्या मुंबईत फोर व्हिलर आणि टू व्हिलर वाहनांची संख्या वाढत असताना मात्र ही वाहने जर सुरक्षित एका जागी उभी करायची असतील तर पार्किंग(वाहनतळ)व्यवस्था त्या मानाने खूप तुटपुंजी आहे.

Two Wheeler Parking from Borivli railway dumping yard | बोरिवलीत रेल्वेच्या डंपिंग यार्डमधून साकारले टू व्हिलर वाहनतळ

बोरिवलीत रेल्वेच्या डंपिंग यार्डमधून साकारले टू व्हिलर वाहनतळ

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई- सध्या मुंबईत फोर व्हिलर आणि टू व्हिलर वाहनांची संख्या वाढत असताना मात्र ही वाहने जर सुरक्षित एका जागी उभी करायची असतील तर पार्किंग(वाहनतळ)व्यवस्था त्या मानाने खूप तुटपुंजी आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहेत. रोज येथून लाखो प्रवासी प्रवास करतात, तर बाहेरगावच्या जाणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबतात. मात्र बोरिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाच्या आवारात टू व्हिलर पार्किंगची सुविधा नव्हती, त्यामुळे टू व्हिलर धारकांची खूप गैरसोय होत होती. ही बाब हेरून उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी याच्या संकल्पनेतून येथे बोरिवली पश्चिमेला फलाट क्रमांक 3च्या बाहेर रेल्वेच्या डंपिंग यार्डमध्ये सुमारे 200 टू व्हिलर राहतील. इतके सुसज्ज वाहनतळ साकारले आहे.

याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वाहनतळ संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना लोकमतला सांगितले की, आपल्या प्रयत्नाने येथे बोरिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला आहे. सुमारे तीन वर्षे येथे काम सुरू होते. त्यावेळी येथे पादचारी पुलाच्या कामासाठी लागणारे टाकाऊ मटेरियल, कंत्राटदार मजुरांसाठी या डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकले जात असे.

बोरिवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर येथे पाहणी करण्यासाठी आले असताना, आपल्याला येथील डंपिंग यार्डची जागा दिसली. आपण या टाकाऊ जागेचा पार्किंगसाठी उपयोग करता येईल का याचा अभ्यास केला. पश्चिम रेल्वेकडे यासाठी 16 मे 2016 ला पश्चिम विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांच्याकडे आपण प्रस्ताव दिला व सतत पाठपुरावा करून 24 सप्टेंबर 2017 रोजी पश्चिम रेल्वे प्रशासनाने आपला सदर प्रस्ताव मंजूर केला.

आपल्या प्रयत्नांना यश येऊन येथील पूर्वी असलेल्या रेल्वे यार्डच्या जागेत सुसज्ज 200 टू व्हिलरसाठी वाहनतळ उभे राहिले. यामुळे बोरिवलीकरांची मोठी सोय झाली, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी अभिमानाने सांगितले. या वाहनतळाचा लोकार्पण सोहळा नुकताच बोरिवली (प.) रेल्वे स्टेशनच्या आवारात असंख्य बोरिवलीकरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी भाजपाचे माजी आमदार हेमेन्द्र मेहता, नगरसेवक विद्यार्थी सिंग, नगरसेविका बिना दोशी, नगरसेविका अंजली खेडकर, नगरसेवक प्रवीण शाह, बोरिवली भाजपा अध्यक्ष दीपक पाटणेकर, मयूर ओव्हरसियर व इतर मान्यवर नेते, पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते. डंपिंग ग्राऊंडमधून येथे सुसज्ज वाहनतळ खासदार शेट्टी यांनी उभे करून दाखवल्याबद्दल बोरिवलीकरांनी त्यांना धन्यवाद दिले.

Web Title: Two Wheeler Parking from Borivli railway dumping yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.