वांद्रे टर्मिनस ते उडपी होळीनिमित्त दोन विशेष एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 05:01 IST2020-03-01T05:01:52+5:302020-03-01T05:01:58+5:30

होळीनिमित्त कोकण आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दोन विशेष एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Two Special Express for Bandra Terminus to Udpi Holi | वांद्रे टर्मिनस ते उडपी होळीनिमित्त दोन विशेष एक्स्प्रेस

वांद्रे टर्मिनस ते उडपी होळीनिमित्त दोन विशेष एक्स्प्रेस

मुंबई : होळीनिमित्त कोकण आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दोन विशेष एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस ते उडपीपर्यंत धावतील. तर, मध्य रेल्वेद्वारे होळी विशेष एक्स्प्रेस एलटीटी ते नागपूरपर्यंत धावतील.
वांद्रे टर्मिनस ते उडपी विशेष एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस ८ मार्च रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल. ती उडपी येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ९ मार्च रोजी उडपी येथून सायंकाळी ७ वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथे दुसºया दिवशी दुपारी ३ वाजता पोहोचेल.
वांद्रे टर्मिनसहून १० मार्च रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल. ती उडपी येथे दुसºया दिवशी सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ११ मार्च रोजी उडपी येथून सायंकाळी ७ वाजता सुटेल. वांद्रे टर्मिनस येथे दुसºया दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल.
११ मार्च रोजी एलटीटीहून रात्री १२.४५ वाजता विशेष एक्स्प्रेस सुटेल. ती नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी २.१० वाजता पोहोचेल. तर, १२ फेब्रुवारीला नागपूरहून सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ती एलटीटीला सकाळी ७.३० वाजता पोहोचेल.

Web Title: Two Special Express for Bandra Terminus to Udpi Holi