Join us

लोकलची धडक लागून दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 17:52 IST

पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रेल्वे स्थानकादरम्यान लोकलची धडक लागून दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रेल्वे स्थानकादरम्यान लोकलची धडक लागून दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास  झाली. पश्चिम रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर राजकुमार शर्मा (४८) आणि वरिष्ठ ट्रकमन नागेश सखाराम सावंत (४०) अशी दोघांची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

पश्चिम रेल्वेच्या बांद्रा रेल्वे फाटका क्रमांक १९ वर फाटकाचे दुरुस्तीचे काम सुरु होते. राजकुमार शर्मा आणि त्यांचे सहकारी वरिष्ठ ट्रकमन नागेश सावंत हे दोघे  खार रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर उतरून पायी-पायी  कामाच्या ठिकाणी जात होते. मात्र पाठीमागून वांद्रे स्थानकाकडे जाणारी जलद लोकल येत होती. लोकल खार स्थानकावर थांबेल, असे त्यांनी गृहीत धरले. त्यामुळे ते पुढे चालू लागले. मात्र लोकल जलद असल्यामुळे ती न थांबता भरधाव वेगाने पुढे आली. यामध्ये दोघांना लोकलची जोरदार धडक लागली. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या दोघांचे मृतदेह वांद्रेतील भाभा रुग्णालयात नेण्यात आले. वांद्रे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :मुंबईरेल्वेमुंबई लोकल