ठाण्यात दोन मेट्रो डेपो! ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला 

By सचिन लुंगसे | Published: August 10, 2023 08:27 PM2023-08-10T20:27:38+5:302023-08-10T20:27:55+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन महत्त्वाच्या मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी महत्त्वाच्या जमिनींचा ताबा मिळवून मेट्रो नेटवर्कच्या विस्तारात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

Two metro depots in Thane Advance possession of 59.63 hectares of land to MMRDA | ठाण्यात दोन मेट्रो डेपो! ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला 

ठाण्यात दोन मेट्रो डेपो! ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला 

googlenewsNext

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन महत्त्वाच्या मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी महत्त्वाच्या जमिनींचा ताबा मिळवून मेट्रो नेटवर्कच्या विस्तारात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.  नव्याने अधिग्रहित केलेल्या जमिनीमुळे मुंबईतील नागरिकांसाठी मेट्रो ट्रेनचे कार्यक्षम संचालन, देखभाल आणि दुरुस्ती सुलभ होईल.

मुंबई मेट्रो मार्ग- १२ च्या डेपो साठी ठाणे जिल्ह्यातील निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जमीन शासनाने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. मौजे निळजेपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे येथील सदर जमीन विनामूल्य असून भोगवटादार म्हणून एमएमआरडीएला देण्याचे आदेश जिल्हाधकाऱ्यांमार्फत निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी मौजे डोंगरी येथील जागेचा आगाऊ ताबा देणेस मान्यता देण्यात आलेली होती, त्यानुसार मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी देखील मौजे डोंगरी येथील ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी दिला आहे. या दोन्ही जागांमुळे ठाणे जिल्ह्यात दोन महत्वपूर्ण मेट्रो मार्गिकांसाठीचे डेपो आता उभारण्यात येणार आहेत जिथे मेट्रो गाड्या विसावू शकतील.

शासनाची भूमिका 
शासनाने रितसर मान्यता प्रदान केलेल्या मेट्रो सारख्या निकडीच्या सार्वजनिक तसेच महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्पांकरीता शासकीय जमीन आवश्यक असेल तेथे अश्या  शासकीय भूखंड उपलब्ध नसेल तर प्रकल्पासाठी गायरान जमीनीचे परिवर्तन जमिनीचे भोगवटामुल्य कितीही असले तरी अटी व शर्तींना अधीन राहून संबंधित जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारांचा वापर करू शकतात. संबंधित जिल्हाधिकारी अशी जमीन राज्य शासनाच्या संबंधित विभागास महसूल मुक्त व सारा माफीने प्रदान करणेस सक्षम असते. त्या नुसार एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी या जमिनी विनामूल्य हस्तांतरित केलेली आहे. या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकारचा सक्रिय पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यासह बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे या जमिनींचे जलद हस्तांतरण सुनिश्चित झाले आहे, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी लागणारा खर्च आणि वेळ या दोन्हींची बचत होणार आहे.

जागतिक दर्जाची वाहतूक 
मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून, निर्माणाधिन असलेल्या ७ मार्गिकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्राधिकरण प्रयत्नशील आहे. हे सर्व प्रकल्प महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प असून त्यांच्यामुळे नागरिकांना अतिरिक्त आणि जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. सध्या ३ मेट्रो मार्गिका कार्यान्वित असून त्यांच्यामुळे लाखो मुंबईकर रोज सुखावत आहेत. तर ७ मार्गिका प्रगतीपथावर आहेत. या सर्व मेट्रो मार्गिकांचे कार्यान्वयन आणि देखभाल दुरुस्तीसाठी मेट्रो डेपो हा प्रकल्पातील अविभाज्य घटक असल्याने त्यांची उभारणी देखील तितकीच महत्त्वाची असते.  

अहवाल आयआयटी मुंबईकडे 
मुंबई मेट्रो मार्ग २ब, ४, ४ अ, ५, ६, ७ अ आणि ९ यांची कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होतील. मेट्रो मार्ग १० साठी विविध पर्यावरण विषयक परवानग्या मिळवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जात आहे, तर मेट्रो मार्ग १४  (कांजूरमार्ग ते बदलापूर) साठी सल्लागाराने मसुदा अंतिम अहवाल एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल आयआयटी मुंबईकडे पिअर रिव्ह्यूसाठी पाठवण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाच्या प्रशासकीय मान्यतेने घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच अगोदर २०.७ किमी लांबीच्या  प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्ग १२ च्या संरेखनचा विस्तार करून ती नवी मुंबई मेट्रो सोबत जोडण्यासाठीचा आवश्य तो अभ्यास सध्या सुरू असून त्या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. मेट्रो मार्ग १२ कल्याण तळोजा ही मार्गिका, मेट्रो मार्ग ५  ठाणे- भिवंडी- कल्याण या मर्गिकेसोबत जोडली जाणार आहे. असल्याने ठाणे ते नवी मुंबई प्रवास देखील काही मिनिटांत शक्य होणार आहे. 

सध्या सर्वच मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून  ही कामे लवकरच पूर्ण होतील. मेट्रो डेपो हे मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीतील अविभाज्य घटक असतो, जो प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे सुव्यवस्थित संचलन करणे, गाड्यांची देखभाल दुरूस्ती या साठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यासोबतच राज्य शासनाच्या मदतीने उर्वरित प्रस्तावित असलेल्या सर्व मेट्रो डेपोसाठीच्या जागा हस्तांतरित करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मेट्रो मार्ग १२ च्या विस्ताराबाबत आम्ही अभ्यास करत असून तीचे नवी मुंबई मेट्रोच्या मेट्रो स्थानकासोबत एकत्रीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. - डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: Two metro depots in Thane Advance possession of 59.63 hectares of land to MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.