Two killed, four injured in road accident in Bandarpur; | वांद्रेत कारची टँकरला धडक अपघातात तरुण ठार, चौघे जखमी
वांद्रेत कारची टँकरला धडक अपघातात तरुण ठार, चौघे जखमी

मुंबई: पाण्याच्या टँकरला कारने दिलेल्या धडकेत कारमध्ये बसलेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. वांद्रे वरळी सी लिंक परिसरात हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला़ याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमजा जुगर इंदोरवाला (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गोरेगावच्या मोतीलाल परिसरात राहतो तर अन्य मित्र बोरिवलीचे राहणारे आहेत. इंदोरवाला हा त्याच्या मित्रांसोबत बोरिवलीला गेला होता. त्यानंतर ते काही कामानिमित्त दक्षिण मुंबईत गेले. तेथून ते वांद्रेच्या दिशेने भरधाव वेगाने येत होते. अडीचच्या सुमारास वरळी सी लिंकच्या यु ब्रिजखाली (टऌ 47 अ 2431) या क्रमांकाचा एक पाण्याचा टँकर रस्त्याच्या एका बाजुला उभा होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती जाऊन टँकरला आदळली आणि ती पलटली. त्यामुळे चालक, त्याच्या मागे बसलेला हमजा आणि त्याचे मित्र जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने स्थानीक रुग्णालयात दाखल केले. इंदोरवाला याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर अन्य चौघांची स्थिती गंभीर आहे़ त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कारचालक आसिफ मेहता याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक केली जाणार आहे़


Web Title: Two killed, four injured in road accident in Bandarpur;
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.