फसवणूक करणाऱ्या दोन इराणींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 05:59 IST2020-01-09T05:59:14+5:302020-01-09T05:59:23+5:30

‘आम्ही परदेशी नागरिक आहोत, आम्हाला भारतीय चलन कसे असते ते दाखवा,’ असे सांगत हातचलाखीने फसवणूक करणा-या दोन इराणी नागरिकांना गजाआड करण्यात आले.

Two Iranians arrested for cheating | फसवणूक करणाऱ्या दोन इराणींना अटक

फसवणूक करणाऱ्या दोन इराणींना अटक

मुंबई : ‘आम्ही परदेशी नागरिक आहोत, आम्हाला भारतीय चलन कसे असते ते दाखवा,’ असे सांगत हातचलाखीने फसवणूक करणा-या दोन इराणी नागरिकांना गजाआड करण्यात आले. बुधवारी अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज़ाद अब्दुल हमीद सिराज सिमीया (५४) आणि इजाज हुसेन नरीमल हमदानी (५८) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अंधेरी परिसरात अशाच प्रकारे एकाला बोलण्यात गुंतवून या दोघांनी त्यांच्याकडून दहा हजार रुपये लंपास करीत पळ काढला. या प्रकरणी अंधेरी पोलिसात तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बळवंत देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, उपनिरीक्षक रवीराज कट्टे, हवालदार संख्ये आणि पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक केली.

Web Title: Two Iranians arrested for cheating