अँटॉप हिल सीजीएस कॉलनीमध्ये खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 00:40 IST2021-10-26T00:38:30+5:302021-10-26T00:40:37+5:30
या मैदानात खेळणारी ही दोन मुले या खड्ड्यात पडल्याचे समजताच त्यांना तत्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे नेले आले. पण डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले.

प्रतिकात्मक फोटो.
मुंबई- अँटॉप हिल सीजीएस कॉलनी, सेक्टर 07 येथील उद्यानात, पाईपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. यशकुमार आलोककुमार चंद्रवंशी (वय - 12 वर्षे) आणि शिवम विजय जैस्वाल (वय - 09 वर्षे), अशी या मृत मुलांची नावे आहेत.
या मैदानात खेळणारी ही दोन मुले या खड्ड्यात पडल्याचे समजताच त्यांना तत्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे नेले आले. पण डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले.
याप्रकरणी अँटॉप हिल अपमृत्यू नोंद क्र 71/21 व 72/21 कलम 174 सीआरपीसी अन्वये नोंद करण्यात आली आहे. तसेच, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.