Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकी चालकांचा खड्ड्यांनी घेतला बळी; उड्डाणपुलावर अंगावरून गेला डंपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 06:25 IST

नायगाव येथे शूटिंगसाठी नासिर आणि छाया हे दुचाकीवरून जात होते.

मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरीवली पूर्वेकडे खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दोन दुचाकी चालकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. नासिर हुसेन शाह आणि छाया खिल्लारे अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही अंधेरी येथील रहिवासी आहेत. 

नायगाव येथे शूटिंगसाठी नासिर आणि छाया हे दुचाकीवरून जात होते. बुधवारी दुपारी दीड वाजता बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील उड्डाणपुलावरून दुचाकीहून ते प्रवास करत असतानाच खड्ड्यामुळे त्यांचा अपघात झाला. या अपघातात डंपर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या दोघांनाही कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

टॅग्स :अपघातमुंबई