अभिनेत्रीशी अरेरावी करणाऱ्यांना दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 23:45 IST2018-08-04T23:45:32+5:302018-08-04T23:45:40+5:30

टेलिव्हिजन मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्या कारची काच शनिवारी दोघांनी फोडली.

The two arrested by the actress are bereft of arrest | अभिनेत्रीशी अरेरावी करणाऱ्यांना दोघांना अटक

अभिनेत्रीशी अरेरावी करणाऱ्यांना दोघांना अटक

मुंबई- टेलिव्हिजन मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्या कारची काच शनिवारी दोघांनी फोडली. याबाबत रुपाली हिने तक्रार केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजवरून दोघांना अटक केली. 

रुपाली शनिवारी सकाळी कारमधूनवर्सोवा येथून जात होती. यावेळी तिच्या कारची धडक एका दुचाकीला लागली. यानंतर दुचाकीवरील दोन तरुणांनी रुपाली हिची कर थांबवली. रुपाली हिने दोघांची माफी मागितली. तरीही हे दोघे वाद घालू लागले. रागाच्या भरात त्यांनी रुपाली हिच्या कारची काच फोडली आणि पळून गेले. रुपाली हिने वर्सोवा पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या दोन तरुणांना शोधून काढले. दहलू आणि परेल अशी या दोघांची नावे असल्याचे वर्सोवा पोलिसांनी सांगितले.

Web Title: The two arrested by the actress are bereft of arrest

टॅग्स :Arrestअटक