मुंबई : स्वस्तात सोने देऊन जास्त नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी सोनल रबारी, तिचा पती मेपा रबारी, त्यांचा भाचा जयदेव रबारी आणि त्यांना मदत करणारा रमेश भानुशाली यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
तक्रारदार भारती भानुशाली (३४) घाटकोपरमध्ये राहतात. जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या ओळखीचे रमेश भानुशाली यांनी आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडून क्रेडिट कार्डद्वारे सव्वादोन लाख रुपये घेतले. त्यानंतर रमेशने भारती दिली. तिने स्वतःकडे गोल्ड स्कीम यांची ओळख सोनल रबारीशी करून असल्याचे सांगत स्वस्त दरात सोने देण्याचे प्रलोभन दाखवले. सोन्याचा दर ५७ हजार रुपये तोळा असताना सोनलने ५० हजार रुपये प्रति तोळा दराने सोने देण्याचे सांगितले. विश्वास बसावा म्हणून २४ कॅरेट सोन्याचे बिस्कीटही दाखवले.
सुरुवातीला नफा मिळाल्याने भारती यांनी आले नातेवाईक व मित्रांनाही या योजनेत गुंतवणूक करण्यास सांगितले. एप्रिल २०२४ मध्ये भारती यांनी आपल्या भावाकडून आणि वडिलांकडून २४ लाख ७५ हजार रुपये घेऊन सोनलच्या घरी दिले. जुलै २०२४ मध्ये सोनलने तातडीची गरज असल्याचे सांगून आणखी १० लाख रुपये घेतले. याशिवाय भारती यांच्या ओळखीतील अनेक व्यक्तींनीही मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले.
अनेकांकडून घेतले पैसे
मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि पतीच्या ओळखीतील व्यक्तींकडून मिळून डिसेंबर २०२४ पर्यंत १.१२ कोटी रुपये सोनल आणि तिच्या पतीकडे देण्यात आले. सोनलने जानेवारी २०२५ च्या शेवटी २ किलो ५ तोळे सोने देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याआधीच तिने आणखी १० लाख रुपये घेतले.
अन् ती बिस्किटे नकली
९ फेब्रुवारी २०२५ रोजी सोनलने तक्रारदारांना अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका ज्वेलर्सकडे नेऊन तीन सोन्याची बिस्किटे दाखवली. मात्र, ती बिस्किटेही तिने पुन्हा स्वतःकडेच ठेवली. यानंतर संशय आल्याने भारती यांनी पोलिसांत तक्रार दिली. तपासात एकूण २.३५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
Web Summary : A couple and two others are booked for allegedly defrauding people of ₹2.25 crore with a fake gold scheme promising high returns. The accused gained trust by initially providing profits before defrauding investors.
Web Summary : एक दंपति और दो अन्य लोगों पर कथित तौर पर नकली गोल्ड स्कीम से 2.25 करोड़ रुपये की धोखाधड़ी करने का मामला दर्ज किया गया है, जिसमें उच्च रिटर्न का वादा किया गया था। आरोपियों ने निवेशकों को धोखा देने से पहले शुरुआत में मुनाफा देकर विश्वास हासिल किया।