Join us

मुंबई पोलीस दलात बाराशे पोलिसांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 07:13 IST

३३४ योद्धे पुन्हा कर्तव्यावर रुजू

मुंबई : कोरोनाबाधित मुंबई पोलिसांचा आकडा २,०२८ वर पोहचला आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या तीन दिवसांत ३८० पोलिसांनी कोरोनावर मात केली असून, गुरुवारपर्यंत १,२३३ कोरोना योद्धा घरी परतले. यापैकी ३३४ योद्धे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

राज्यभरात १,३८८ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांचा मृत्यूचा आकडा ३६ वर गेला आहे. तर मुंबईत आतापर्यंत २२ पोलिसांना जीव गमावला आहे. मुंबईतील ५१६ कोविड सेंटरपैकी २२४ केंद्रांवर पोलिसांवर उपचार सुरू आहेत. ३३ पोलिसांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. दरम्यान, एसआरपीएफच्या जवानांमध्ये आठवडाभरात नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र