टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 01:47 IST2020-01-25T01:46:00+5:302020-01-25T01:47:20+5:30
राहत्या घरी गळफास लावून संपवले जीवन

टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या
मुंबई - प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मा हिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजय शर्मा ही दिल तो हॅप्पी है जी या मालिकेमुळे सेजल शर्मा ही प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सेजल शर्मा ही मीरा रोड येथे वास्तव्यास होती.
मूळची राजस्थानची असलेल्या सेजल शर्मा हिला दिल तो हॅप्पी है जी या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. दिल तो हॅप्पी है जी या मालिकेपूर्वी तिने काही व्यावसायिक जाहीराती आणि वेब सीरिजमध्ये काम केले होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सेजलने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.