Join us

VIDEO : टीव्ही अभिनेत्री रुही सिंहचा मद्यपान करुन धिंगाणा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 10:21 IST

टीव्ही अभिनेत्री रुही सिंह हिने मद्यपान करुन धिंगाणा घातल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रुही सिंह हिच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुही सिंह हिने मद्यपान करुन धिंगाणा घातल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रुही सिंह हिच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रुही सिंह हिच्यासोबत असेलेल्या राहुल सिंह आणि स्वप्नील सिंह या तिच्या मित्रांनाही याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

सोमवारी रात्री उशिरा बांद्रा येथील एका मॉलजवळ रुही सिंह आणि तिच्या चार मित्रांनी धिंगाणा घातला. यानंतर मॉलच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशी सुद्धा त्यांनी हुज्जत घातली. याप्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, रुही सिंह, राहुल आणि स्वप्नील यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहेत. याप्रकरणी राहुल आणि स्वप्नील यांनी अटक करण्यात आली. तर रुही सिंह आणि इतर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली. 

पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी सांगितले की, 'घटनास्थळावरुन घरी जाताना रुही सिंहने पार्किंगमधील गाड्यांना धडक दिली. ती दारुच्या नशेत होती. यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंग गुन्हा दाखल केला आहे.' 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी