Join us

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, आता दिव्यांग कल्याण विभागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:52 IST

रोखठोक निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंढे यांची गेल्या २० वर्षांतील ही २२ वी बदली आहे.

मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने पुन्हा एकदा बदली केली आहे. असंघटित कामगार आयुक्त असलेले मुंढे यांची बदली आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.

रोखठोक निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंढे यांची गेल्या २० वर्षांतील ही २२ वी बदली आहे. त्यांची दिव्यांग कल्याणचे सचिव म्हणून बदली करताना हे पद अधिकालिक वेतन श्रेणीत अवनत करण्यात आले आहे. 

मुंढे यांच्याशिवाय आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांचीही मंगळवारी बदली करण्यात आली.

 

टॅग्स :तुकाराम मुंढेबदली