सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:07 IST2021-01-03T04:07:32+5:302021-01-03T04:07:32+5:30

मुंबई पोलीस आयुक्त : सीबीआयचा निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळता असेल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ...

Truth will win in Sushant Singh's case | सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार

सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार

मुंबई पोलीस आयुक्त : सीबीआयचा निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळता असेल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृृत्यू प्रकरणात सीबीआयचे अधिकारी लवकरच या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील. या प्रकरणाचा जो निष्कर्ष सीबीआयकडून काढला जाईल, तो आमच्या तपासाशी मिळताजुळताच असेल. अखेर, सत्याचाच विजय होणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

विविध चोरीच्या गुन्ह्यांत जप्त केलेली मालमत्ता नववर्षाच्या निमित्ताने शुक्रवारी तक्रारदारांना आयुक्तांंच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ते म्हणाले, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावरून मुंबई पोलिसांना टार्गेट करण्यात आले. पुढे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. मात्र, अद्यापही याबाबतचा अंतिम अहवाल मिळालेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने आम्ही केलेल्या तपासाला अतिशय ‘प्रोफेशनल’ तपास असे म्हटले होते. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा जो निष्कर्ष काढेल, तो आमच्या निष्कर्षासारखाच असेल, असा विश्वास आयुक्त परमबीर सिंह यांनी व्यक्त केला.

Web Title: Truth will win in Sushant Singh's case