नेमकं काय आहे सत्य? अरिजीत सिंहकडून गाणं हिरावून घेतल्याच्या आरोपामुळे सलमान खान हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 11:58 IST2018-02-20T11:51:13+5:302018-02-20T11:58:09+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा दबंग सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यातील शीत युद्धाची चर्चा सुरू आहे.

truth behind arijit singh salman cold war welcome to newyork song | नेमकं काय आहे सत्य? अरिजीत सिंहकडून गाणं हिरावून घेतल्याच्या आरोपामुळे सलमान खान हैराण

नेमकं काय आहे सत्य? अरिजीत सिंहकडून गाणं हिरावून घेतल्याच्या आरोपामुळे सलमान खान हैराण

मुंबई - बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा दबंग सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यातील शीत युद्धाची चर्चा सुरू आहे. सलमान खाननं 'वेलकम टू न्यूयॉर्क' सिनेमातील अरिजीत सिंहनं गायलेले गाणं हटवून त्याच्याऐवजी राहत फतेह अली खान यांच्याकडून पुन्हा गाणं रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. अरिजीत-सलमानमधील शीत युद्धाची बातमी समोर आल्यानंतर यामध्ये खरंच काही तथ्य आहे की नाही?,याचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 

सलमान खानने 'वेलकम टू न्यूयॉर्क'मधील 'इश्तिहार'या गाण्यासाठी अरिजीत सिंहऐवजी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांची निवड केल्याचं समजतं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वृत्तामध्ये अजिबात तथ्य नाहीयेत. वेलकम टू न्यूयॉर्क सिनेमा सलमान खानचा नसून तो केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सिनेमाच्या संगीताबाबत सलमानशी काहीही संबंध नाहीय. दरम्यान, या बातमीमुळे स्वतः सलमान खान आश्चर्यचकीत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरिजीतला वेलकम टू न्यूयॉर्क सिनेमामध्ये गाणं न मिळण्या मागील कारण निर्माते असू शकतात. दोघांमध्ये झालेल्या चर्चेअंती अरिजीतला कदाचित गाणं मिळालं नसेल. कारण शेवटी निर्मात्यांनाच याचा निर्णय घ्यावा लागतो.  

एकूणच या घटनेमुळे, खरंच सलमाननं अद्यापही अरिजीत सिंहला माफ केलेले नाही का?, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वी, सलमान खानने 'सुलतान' या सिनेमातील 'जग घूमेया' हे गाणं अरिजीतकडून काढून घेऊन राहत फतेह अली खान यांना दिलं होतं. तसंच 'टाइगर जिंदा है' सिनेमामधील 'दिल दियां गलां' हे गाणं आतिफ असलमला दिलं होतं. 

नेमका वाद कशावरून?
सलमान व अरिजीत सिंहमधील भांडण 2014मध्ये सुरू झालं. एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतला सर्वोत्कृष्ठ गायकाचा पुरस्कार मिळाला होता. अरिजीत पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानने अरिजीतबरोबर मस्करी केली. झोपला होतास? असा प्रश्न सलमानने विचारला. त्या प्रश्नाला अरिजीतने उत्तर दिलं. सलमानच्या होस्टिंग स्टाइलला उद्देशून अरिजीत म्हणाला, तुम्ही  झोपण्यास भाग पाडलं. सलमानने नंतर अरिजीतच्या 'तुम ही हो', गाण्याला टार्गेट केलं. अशी गाणी वाजली तर झोप येणारच, असं सलमान खान म्हणाला होता. 

Web Title: truth behind arijit singh salman cold war welcome to newyork song