Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या नाकाबंदीसाठी उभारलेल्या मंडपाला ट्रकची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 15:35 IST

माल घेऊन आलेला ट्रक बुधवार - गुरुवारच्या रात्री पुन्हा महामार्गाच्या दिशेने जात होता . त्यावेळी गोल्डन नेस्ट चौकी येथे नाकाबंदी साठी उभारलेल्या मंडपच्या उंचीचा अंदाज न आल्याने चालकाने ट्रक मंडपात घुसवला.

ठळक मुद्देमाल घेऊन आलेला ट्रक बुधवार - गुरुवारच्या रात्री पुन्हा महामार्गाच्या दिशेने जात होता . त्यावेळी गोल्डन नेस्ट चौकी येथे नाकाबंदी साठी उभारलेल्या मंडपच्या उंचीचा अंदाज न आल्याने चालकाने ट्रक मंडपात घुसवला.

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या स्वातंत्र्य वीर सावरकर चौक येथील गोल्डन नेस्ट पोलीस चौकी जवळ नाकाबंदी साठी उभारलेल्या मंडप एका ट्रकच्या धडकेने मोडकळीस आला . पोलिसांनी ट्रक चालकावर कारवाई केली आहे.

माल घेऊन आलेला ट्रक बुधवार - गुरुवारच्या रात्री पुन्हा महामार्गाच्या दिशेने जात होता . त्यावेळी गोल्डन नेस्ट चौकी येथे नाकाबंदी साठी उभारलेल्या मंडपच्या उंचीचा अंदाज न आल्याने चालकाने ट्रक मंडपात घुसवला. जेणे करून मंडप कोलमडला . यावेळी कुणी पोलीस कर्मचारी नव्हता, सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही .  मंडपाच मोठं नुकसान झाले असून ट्रक ओवरलोड असल्याने चालकाला नवघर पोलिसांनी ताब्यात घेतलं. चालकावर कायदेशीर कारवाई करून दंड भरून घेण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश कड यांनी सांगितले

टॅग्स :मुंबईअपघात