शहिदांना श्रद्धांजली

By Admin | Updated: November 27, 2014 02:23 IST2014-11-27T02:23:08+5:302014-11-27T02:23:08+5:30

मुंबईवरील भयंकर अशा दहशतवादी हल्ल्याला आज सहा र्वष उलटली. या हल्ल्यात आपल्या जिवाची बाजी लावणा:या पोलीस आणि सुरक्षा जवानांना सर्वच स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Tribute to martyrs | शहिदांना श्रद्धांजली

शहिदांना श्रद्धांजली

1मुंबईवरील भयंकर अशा दहशतवादी हल्ल्याला आज सहा र्वष उलटली. या हल्ल्यात आपल्या जिवाची बाजी लावणा:या पोलीस आणि सुरक्षा जवानांना सर्वच स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि उद्योगमंत्री प्रकाश महेता यांनी शहीद स्मारकाला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. 
2मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात प्रधान समितीच्या शिफारशींची लवकर अंमलबजावणी करण्याचा शासनाचा प्रय} असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय व त्याच्या अंमलबजावणीला राज्य शासनाने प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी महापौर स्नेहल आंबेकर, पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया उपस्थित होते. 
3राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनीही आज शहिदांना श्रद्धांजली वाहिली. शहीद तुकाराम ओंबळे पुतळा आणि शहीद स्मारकस्थळी पुष्पचक्र अर्पण केले. 
 
काँग्रेसतर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली : 26 नोव्हेंबर 2क्क्8 साली झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पक्षाच्या दादर येथील टिळक भवन कार्यालयात दोन मिनिटे मौन बाळगून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश, खा. हुसेन दलवाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
विरोधी पक्षनेत्यांनी वाहिली तुकाराम ओंबळे यांना श्रद्धांजली : विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नंतर वरळी येथील शहीद ओंबळे यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. 

 

Web Title: Tribute to martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.