Join us

वेटिंग तिकिटावर रेल्वे प्रवास करताय? सावधान! रेल्वेनं काय केलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:38 IST

सध्या उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १,२०० पेक्षा जास्त, तर पश्चिम रेल्वेने २,५०० पेक्षा जास्त विशेष सेवा जाहीर केल्या आहेत.

मुंबई : गेल्या तीन महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेसमधून वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्या ५६ हजार प्रवाशांना प्रशासनाने  ट्रेनमधून उतरवले आहे, तर ७८ हजार प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू दिले नाही. रिझर्व्हेशन कन्फर्म असलेल्या प्रवाशांना प्रवासात अडचण होऊ नये यासाठी ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १,२०० पेक्षा जास्त, तर पश्चिम रेल्वेने २,५०० पेक्षा जास्त विशेष सेवा जाहीर केल्या आहेत. आरक्षण न झाल्यामुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी रेल्वेने वेटिंग तिकिटांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मेल-आणि एक्स्प्रेस ट्रेनमधील तिकीट कन्फर्म होण्याचा ट्रेंड विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. अनेकदा प्रवासी कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने ते तत्काळ आणि वेटिंग तिकिटावर प्रवास करतात. आता रेल्वेने अशा प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेने प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी केली आहे. त्यात स्लीपर आणि थर्ड एसी कोचमध्ये जास्त वेटिंग तिकिटे दिली जात नाहीत.

...तर तिकिटाची रक्कम परत

आरक्षणाच्या खिडकीवरून तिकीट काढलेल्या वेटिंग तिकीट असलेल्यांना पूर्वी रिझर्व्हेशनचा चार्ट तयार झाल्यावर प्रवासाची मुभा होती. मात्र, आता फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्यास परवानगी आहे.

वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना ट्रेनमधून उतरवले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास अगोदरपर्यंत खिडकीवरून तिकीट काढलेल्या वेटिंग प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची रक्कम परत केली जात आहे.

प्रवाशांच्या आरामदायक

प्रवास करता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कन्फर्म तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत.

विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

वेटिंग तिकीट प्रवाशांवरील कारवाई (जानेवारी ते एप्रिल)

रेल्वे मार्ग       उतरवलेले       प्रवेश करू न                         प्रवासी  दिलेले प्रवासी   

मध्य रेल्वे      २४,२५९ २९,२९८

पश्चिम रेल्वे    ३१,८०१ ४९,३५४

टॅग्स :रेल्वेमुंबई