Mumbai Local Mega Block: रविवारी महत्वाचे काम असेल तरच करा लोकलने प्रवास; मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 07:09 IST2025-11-29T07:09:24+5:302025-11-29T07:09:24+5:30
Mumbai Local Mega Block on Sunday: ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील

Mumbai Local Mega Block: रविवारी महत्वाचे काम असेल तरच करा लोकलने प्रवास; मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेणार
मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार दरम्यान रविवारी दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ यादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड या मिळणार नाही. स्टेशनवर लोकल मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्टमार्ग वगळून अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल दरम्यानच्या हार्बर मार्गावरील वाहतूकही बंद राहणार आहे. यासह ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाण्याकडे दरम्यानच्या सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. तर, ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.